दहा हजार रुपये लंपास

| पनवेल | वार्ताहर |

केबिनच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून दहा हजार रुपये चोरून नेल्याप्रकरणी दोन अनोळखी इसमांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीम पप्पू खान (40) हे शेल्टर कॉर्नर बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करतात. त्यांना सुपरवायझरने दहा हजार रुपये पगाराचे दिले होते. त्यांनी ते राहात असलेल्या केबिनमधील कापडी बॅगेत ठेवले. त्यानंतर ते झोपी गेले. त्यांच्या केबिनच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून दोघांनी दहा हजार रुपये चोरून नेले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले असता अनोळखी इसमांनी केबिनमधील बॅग घेऊन गेल्याचे दिसून आले.

Exit mobile version