| नवी दिल्ली | वृत्तसत्ता |
एलिट ग्रुप सी मध्ये गुजरात विरूध्द पंजाब यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यामध्ये गुजरात संघाकडून खेळणारा प्रियजीत सिंगने तुफानी कामगिरी केली. त्याने पहिल्या आणि दुसर्या डावात 5-5 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 15.5 षटकांत 60 धावा देत विकेट्स घेतले तर दुसर्या डावात 39 धावा देत 5 विकेट्स घेतले. या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक करत आहेत. प्रियजीक सिंह जडेजाने नुकतेच त्याच्या करियरला सुरूवात केली असून तो एक युवा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 3 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने 13 विकेट्स मिळवल्या आहेत.