दहावी बोर्डाचे प्रवेशपत्र १८ फेब्रुवारीपासून उपलब्ध

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारपासून (१८ फेब्रुवारी) www.mahahsscboard.in या लिंकवर उपलब्ध होणार आहे. प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यावर त्याची मुद्रित प्रत शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहेत.
दहावीची परीक्षा येत्या १५ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळांना राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in मध्ये दुपारी एक वाजल्यानंतर उपलब्ध होतील. त्यानंतर शाळांनी प्रवेशपत्राची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. त्यासाठी शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारायचे नसल्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

Exit mobile version