निजामपूरमध्ये भीषण अपघात! १जण ठार

| माणगाव | प्रतिनिधी |

निजामपूर येथे भर बाजारपेठेत भरधाव वेगाने आलेल्या पिकअपची धडक लागल्याने या अपघातात निजामपूर येथील तरुणाचा मृत्यू झाला तर तिन्ही वाहनांचे नुकसान झाले.

सदरील अपघात मंगळवारी (दि.18) रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडला. बोलेरो पीकअपचा चालक भगवंत काशीराम चव्हाण याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्या वाहनाची मोटारसायकल तसेच उभ्या असलेल्या रामदास दत्तु पवार (वय-38) रा.निजामपूर ता.माणगाव यास जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले. या पीकअपने रुग्णवाहिकेलाही जोराची धडक दिली. अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच आरोपी पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार श्री.तुणतुणे हे करीत आहेत.

Exit mobile version