भीषण अपघात! टँकर चालकाचा जागीच मृत्यू

| रसायनी | प्रतिनिधी |

वाशिवली गावाच्या हद्दीत वडगावजवळ झालेल्या अपघातात टँकर चालक लालचंद रामनिवास गौड (वय 57, रा.प्रतापगड उत्तरप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.4) घडली.

लालचंद गौड हे सावरोळी सिध्देश्वरी या मार्गावरून (एमएच-46-बीएफ-7571) टँकर घेऊन जात होते. यावेळी एच.एस.केळकर प्रा. लि. कंपनीजवळ आले असता त्यांचा वाहनावरील ताबा सुटला व त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच टॅकरमध्ये केमिकल असल्याने अपघात होताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

अपघाताची बातमी समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी म्हामुणकर, कोल्हेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास ठाणे अंमलदार पानपट्टे करीत आहेत.

Exit mobile version