भीषण अपघात! तीन कारना धडक देऊन कंटेनर पलटी

कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनर पलटी

| खोपोली | प्रतिनिधी |

मुंबई -पुणे एक्सप्रेस बोरघाटात अंडा पॉईंडजवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने, तीन कारना धडक देऊन कंटेनर पलटी झाला. मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवरून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एनएल -01-एसी -1283 ) हा बोरघाटात अंडा पॉईंड जवळ आला असता, कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने एर्टिगा कार (एमएच – 01-डीपी -6516 ) तर स्विफ्ट (एमएच -04- एलक्यू -3778 ) तर व्हागेनर कार (एमएच -46- बीव्ही- 1894 ) या तीन कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन कंटेनर एक्सप्रेसवेवर पलटी झाला, तर कंटेनरमधील चालक व क्लीनर याला किरकोळ मार लागला असून त्यांना तात्काळ इमजिएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही, तर एक्सप्रेसवेवरील पडलेला कंटेनरला क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version