। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. चोरावले गावांत घराचे छप्पर उडून गेले आणि काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. शाळा, गोठे, झाडांची पडझड झाली आहे. जनावरे रस्त्यावर तर सर्वसामान्यांचा संसार मोडकळीस जाऊन आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने याचा पंचनामा करून लवकरात लवकर भरपाई मिळून द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. तालुक्याला मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गारपीटीसह वादळी वारा यामुळे सर्वसाम्यान्याचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. तसेच, वाकस ग्रामपंचायत हद्दीतील चोरावले गावात वादळी वार्यामुळे विनोद वसंत शेळके, सुगंधा मधुकर शेळके, वामन पोसू डायरे, मेघा मारुती डायरे यांची घरची पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.