उरण तालुक्यात चोरांची दहशत

नितीन फोटो स्टुडिओ वर चोरांनी मारला डल्ला
। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यातच गजबजलेल्या उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील नितीन फोटो स्टुडिओच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी स्टुडिओमधील तीन कॅमेरे, लॅपटॉप व कॉम्प्युटर हे सामान घेऊन पोबारा केल्याची घटना शुक्रवारी (दि. 29) उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेसंदर्भात नितीन फोटो स्टुडिओचे मालक नितीन मालुसरे यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version