नार्वेकरांविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात

| मुंबई | प्रतिनिधी |

आमदार अपात्रप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलाय. या निकालाविरोधात ठाकरे गटानं आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी (दि.15) विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदार अपात्रप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर सांगितले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादा सोडल्या, अशा शब्दांत आमदार अपात्र निकालप्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती.

Exit mobile version