| शिहू | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील शिहू जिल्हा परिषद गटातील उमेदवार पल्लवी भोईर व शिहू पंचायत समिती गणातील उमेदवार संजय भोईर यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री बहिरेश्वर जोगेश्वरी मातेच्या मंदिरात करण्यात आला. दरम्यान, शिहू ग्रामस्थांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा देत सर्वाधिक मतधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी पेण पंचायत समिती माजी सभापती मनीषा भोईर, शिहू माजी सरपंच विश्वास मोकल, भास्कर म्हात्रे, माजी उपसरपंच सुजित गदमले, चंद्रकांत अडसूळे, केशव म्हात्रे, नरेश म्हात्रे, जयराम म्हात्रे, हेमंत मोकल, मुजीफ मोमीन, वसंत पाटील, सदस्य हिरावंती शेळके, निलिमा म्हात्रे, जयश्री खाडे, अक्षदा गदमले, शिल्पा भोईर, यमुना पाटील, चंद्रकांत पाटील यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला व युवक उपस्थित होते.
शिहूत ठाकरे गटाचा प्रचार
