| शिहू | वार्ताहर |
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विभाग शिहू च्या वतीने हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा काढण्यात आली. हिंदुस्थानाची पताका ही प्रभू श्रीराम ते शिव शंभू छत्रपती यांची भगवी असली पाहिजे. या पदयात्रेत भगवा ध्वज घेऊन, देश भक्तीपर गीते म्हणत शिहू फाटा ते शिहू अशी काढण्यात आली. या वेळी योगेश ठाकूर, एकनाथ पाटील, महेंद्र गदमले, शशिकांत शेळके, प्रवीण देवकर, अनंत भूरे, सरिता पाटील, एकनाथ घासे, प्रफुल पाटील, राज गदमले, अक्षय पाटील, नितीन पाटील, अमोल खाडे, प्रणित खाडे, दीपेश भोईर, मोहन म्हात्रे, प्रवीण कुथे, विकास म्हात्रे, प्रफुल म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, शुभंम मोकल, युवराज पाटील, रणजित मोकल यांच्यासह असंख्य तरुणांनी वारकरी टोपी परिधान करून या पदयात्रेत सहभाग घेतला.