Thackrey V/S Shinde: शिवसेना कोणाची; 8 ऑगस्टला होणार स्पष्ट?

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 हून आमदार सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. आता शिवसेना पक्ष कोणाचा, असा प्रश्‍न उपस्थित होत असून याचे पुरावे 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे-ठाकरे यांच्या वादाला वेगळे वळण आले आहे. याशिवाय शिवसेना नक्की कोणाच्या पारड्यात पडणार याकडे कट्टर शिवसैनिकांसह सार्‍यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षावर दावा करण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त करण्यात येत होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना कोणाची आहे, यासंदर्भातील पुरावे ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे दुध का दुध पानी का पानी, होईल असे सांगितले.

निवडणूक आयोगाने पुरावे सादर करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक आयोगासमोर भूमिका मांडण्यात येईल. शिंदे गटातील प्रत्येकजण शिवसेनेत आहे. या गटाला 50 आमदार आणि लोकसभेत 2/3 सदस्यांनी पाठिंबा दिला आहे.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Exit mobile version