तळा केंद्राच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

। तळा । वार्ताहर ।

तळा केंद्रातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. तळा मराठी शाळेसमोरील पटांगणावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तळा मराठी शाळा, खैराट, वानस्ते, खांबवली, तारणे, बामणघर, आनंदवाडी, खांबवली आदिवासी वाडी, उर्दू शाळा, बेलघर यांसह तेरा शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी, गोळाफेक आदी स्पर्धांमध्ये मराठी शाळा,उर्दू शाळा, आदिवासी वाडी शाळा या शाळांनी यश संपादन केले. यावेळी केंद्र प्रमुख लियाकत राऊत, मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, सुनिल बैकर यांसह सहभागी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version