विज्ञान प्रदर्शनात तळे विभागास यश


| तळा | वार्ताहर |

तालुका तळा पंचायत समिती शिक्षण विभाग व गणित-विज्ञान अध्यापक, मंडळ तळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 21 वे तळा तालुका विज्ञान प्रदर्शन 2023 – 2024 मध्ये तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. गोपीनाथ महादेव वेदक विद्यामंदिर या शाळेची विद्यार्थिनी स्वरा गायकवाड हिने विज्ञान प्रतिकृतीमध्ये प्रथम, वक्तृत्व मध्ये द्वितीय, निबंध मध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले तर कला, वाणिज्य व विज्ञान कानिष्ठ महाविद्यालयातील जयश्री काप हिने विज्ञान प्रतिकृतीमध्ये प्रथम, वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या दोन्ही स्पर्धकांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

या स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक गटातून एकूण 24 शाळा सहभागी झाल्या होत्या. या दोन्ही स्पर्धकांना श्री.महाडकर, श्री. भागवत, श्री. भुरे, श्री. जमादार, श्री. शिंदे, श्री. वाडीकर, श्री. आंबेगावे, सौ. कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, मंगेश देशमुख, महेंद्र कजबजे व सर्व संस्था पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर यांनी त्यांचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version