जाहिरात फलक कोसळले

| पनवेल | वार्ताहर |

घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून 16 जणांचा मृत्यू घडल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (दि.1) खारघर सेक्टर-34 येथील आमदूत मेट्रो स्टेशन समोर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरात फलक कोसळण्याची घटना घडली आहे. यावेळी या ठिकाणाहून जाणाऱ्या दोन महिला थोडक्यात बचावल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शिनी दिली. या दुर्घटनेत परिसरात उभ्या असलेल्या एका बैलगाडीचे आणि रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोचे नुकसान झाले आहे. पालिकेतर्फे नेमण्यात आलेल्या कंपनीकडून खारघर शहरात विविध भागात फलक उभारण्यात आले असून हे फलक उभारताना जाहिरातदार कंपनी नियमांच उल्लंघन करत असलायचे यावरून दिसून येत आहे. कारण कोसळलेल हे जाहिरात फलक अत्यंत कमी खोदाई करुन लावण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन जाहिरात फलक कंपनीवर कारवाई करणार का, असा सवाल राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या शहाबाज पटेल यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version