। उरण । प्रतिनिधी ।
उरणच्या विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात तालुक्याच्या प्रश्नांकडे लक्ष न देता आमदारकीचा वापर केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठीच केल्याने येथील जनता त्यांच्यावर नाराज आहे. अशा बिनकामी आमदाराला घरी बसवून तालुक्याचा विकास साधण्यासाठी अवघी तरूणाई प्रीतम म्हात्रे यांच्या मागे एकवटली आहे. उरण विधानसभा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी प्रचार रॅलीच्या निमीत्ताने पागोटे, वेश्वी, दादरपाडा, फुडे, बोकडवीरा, करंजा, नवाशेवा गावाचा झंजावाती दौरा केला. या दौर्यात प्रीतम म्हात्रे यांनी स्वतःला प्रचाराच्या कामात झोकून दिल्यामुळे तरूणाई त्यांच्यापाठीशी असून प्रचारात वेगळीच रंगत आणली असून शेकापची हवा निर्माण झाली आहे.