संदीप जाधव यांचा निर्धार
। महाड । प्रतिनिधी ।
महाड विधानसभेची निवडणूक आता सामान्य मतदारांनीच हातात घेतली आहे. यावेळी धनशक्ती विरूद्ध जनशक्तीच्या निवडणूकीत महाडच्या मविआच्या उमेदवार स्नेहल जगताप यांना चार हजारांचे मताधिक्य देणार, असा ठाम निर्धार माजी नगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केला आहे. महाड शहरात स्नेहल जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार रॅलीत ते बोलत होते.
नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात स्नेहल जगताप यांनी केलेल्या कामांची शहरातील नागरीकांना चांगलीच जाण असल्यामुळे स्नेहल जगताप यांच्या रूपाने या मतदार संघातून प्रथमच एका महिलेला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रशासकीय भवनाला मलीदा गँगचा विळखा पडला असल्याचे दिसून येते. स्नेहल जगताप यांच्यासारखा सुशिक्षित व सुजाण उमेदवार निवडून येणे ही या मतदार संघाची खरी गरज असून या मतदार संघात आता परिवर्तन अटळ असल्याची खात्री संदीप जाधव यांनी यावेळी दिली आहे.
या प्रचार रॅलीत माजी नगराध्यक्ष सुर्यकांत शिलीमकर, शहरप्रमुख सुदेश कलमकर, पुष्पलता जगताप, निता शेठ, मंगेश देवरूखकर,बंटी पोटफोडे, तृप्ती रत्नपारखी, अस्मिता शिंदे, पुजा गोविलकर, बाळा साळवी, विजय तांबट, नितीन जोशी, अतुल जोशी, दिलीप जैतपाल, विजय चव्हाण, अक्षय दळवी, रोहित गोविलकर, राहूल देवरूखकर, निलेश यादव, भाई पाटील, नंदू देवरूखकर, अमित यादव, शितल जगताप, स्मिताली यादव, पुजा जगताप, आतिष पोटसुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.