आपटा तलावाला अड्ड्याचे स्वरुप

| आपटा | वार्ताहर |

आपटा गावातील मुख्य रस्त्यावरील तळयाला दारु अड्ड्याचे स्वरुप आलेले आहे. येथे खुलेआम दारू पिणे चालू असते. परिसरात दिवे नाहीत व बसण्याची जागा उपलब्ध असल्याने तळीरामांसाठी हे ठिकाण सोईस्कर झालेले आहे. तेथे सतत दारुच्या बाटल्या पडलेल्या आढळून येतात. यावर आपटा ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. हे ठिकाण सार्वजनिक असल्याने येथे मद्यपान करण्यास बंदी असलेला फलक लावणे गरजेचे आहे. दुर्दैवाने ग्रामपंचायतीकडून अशी कृती केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

Exit mobile version