अल्काइल क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता

| आपटा | प्रतिनिधी |

अल्काईल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने दरवर्षी अल्काईल क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाही हा क्रीडा महोत्सव दि. 26 आणि 27 डिसेंबर ला चावणे येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत उत्साहात पार पडला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अल्काईल अमाइन्सचे वरीष्ठ अधिकारी तुषार शिंदे, युनिट एचआर अर्चना माने, सिनियर सी.एस.आर. ऑफिसर निकिता म्हात्रे, सी.एस.आर कन्सल्टंट रवी ओंकार, तसेच चावणे शाळेचे प्राचार्य पद्माकर झिंगे, सहभागी शाळांचे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षक, कैलास सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. अल्काईल अमाइन्सतर्फे शुभम वेताळ, संदीप पाटील आणि ओमकार पिंगळे यांनी तसेच चावणे शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अमोल सहकार्य लाभले. प्रथमोपचाराची जबाबदारी मनीष बेहरा यांनी सांभाळली होती.

विद्यार्थ्यांनी क्रीडा भावनेने स्पर्धेचा आनंद घेतला. कबड्डी, खो खो, लंगडी, डॉज बॉल, रस्सी खेच, गोळा फेक, थाळी फेक, 100 आणि 200 मीटर धावणे अशा विविध मैदानी खेळांनी ही स्पर्धा गाजली. याप्रसंगी चावणे शाळेचे सह शिक्षक श्री वाघ यांचा महाराष्ट्र राज्य खो खो टीमचे कॅप्टन झाल्याबद्दल अल्काईल अमाइन्स तर्फे सत्कार करण्यात आला. जिद्द, चिकाटी, एकी यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपले कसब पणाला लाऊन अल्काईल अमाइन्स ने आयोजित केलेल्या स्पर्धांना उचित न्याय दिला. परिसरातील आठ शाळांनी जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धा गाजवल्या आणि सर्व स्पर्धात मिळून 120 बक्षिसं पटकावली.
भरघोस बक्षिसं असलेला पारितोषिक वितरण समारंभ अल्काईलच्या युनिट एचआर अर्चना माने, चावणे शाळेचे प्राचार्य पद्माकर झिंगे, एस आर कन्सल्टंट रवी ओंकार, सचिन आंब्रे, तुषार शिंदे, शुभम वेताळ, ओमकार पिंगळे, निलेश बेहरा यांच्या हस्ते पार पडला. चावणे शाळेतील श्री खरे, कैलास सोनार आणि त्यांचे सहकारी यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.

Exit mobile version