| रसायनी | प्रतिनिधी |
वसुबारसचे औचित्य साधून अल्काईल अमाइन्सच्या मोहोपाडा येथील कॉलनीत 1 हजार पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘प्रत्येक सैनिक एक पणती’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून निवृत्त नौदल कमांडर दीपक जांबेकर यांना आमंत्रित केले होते. त्यांचे रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभव उपस्थितांना खूप भावले. अल्काईल अमाइन्सच्या कॉलनीतील सर्व कुटुंबीय तसेच प्रेरणा जल्लोष आणि स्फूर्ती महिला मंडळ यांनी हा सोहळा यशस्वी करण्यात मोठा हातभार दिला.







