। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सारडे गावच्या सर्वांगिण विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आघाडीने कंबर कसली आहे. आघाडीने जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना संधी दिल्याने युवा मतदारांनी विकासासाठी एकत्रित येण्याच्या निश्चय केला आहे. थेट सरपंचपदासाठी शेकापक्षाचे प्रा. सुशांत रामचंद्र माळी यांना आघाडीने उमेदवारी दिली आहे. उच्चशिक्षीत असलेले प्रा. सुशांत माळी यांना सारडे ग्रामस्थांचा मोठया प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत शेकापक्षाच्या माध्यमातून सारडे गावात मोठया प्रमाणावर विकास कामे करण्यात आली आहे. यापुढेही अनेक विकासकामे आणि समाजोपयोगी कामे करण्याचा निर्धार शेकाप-शिवसेना आघाडीने केला आहे.

शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना आघाडी यांच्या माध्यमातून आपण थेट सरपंच पदासाठी या ठिकाणी उभे आहोत. सारडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा सारडे गावासाठी माझे जे ध्येय आहेत त्या ध्येयाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सारडे गावातील व्यायामशाला नूतनीकरण असेल तलाव दुरुस्ती असेल मंदिर असेल पाण्याची नवीन टाकी बांधणी असेल गावांतर्गत नवीन पाईपलाईन पाण्यासाठी टाकणे असेल तसेच एमएमआरडीएच्या अंतर्गत प्रस्तावित ६५ लाखांचे रस्ता बांधण्याचं काम जे प्रलंबित आहे किंवा प्रस्तावित आहे हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये वॉल कंपाउंड असेल किंवा हॉल बांधणे असेल अशी अनेक कामे या ठिकाणी करायची असल्याचा मानस देाील प्रा. सुशांत माळी यांनी व्यक्त केला आहे.

शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रांमध्ये तरुणांसाठीा रोजगाराची निर्मिती कशी होईल किंवा या ठिकाणी गावातील सर्व सुशिक्षित तरुण कशा पद्धतीने आपल्या गावासाठी एकत्र येऊन काम करू शकतील त्यासाठी मला योग्य नियोजन करून गावासाठी काम करायचा आहे. गरीब गरजू आणि या ठिकाणी सर्वच लोकांसाठी मला परिपूर्ण काम करायचं आहे. गरिबांच्या ज्या काही छोट्या छोट्या गरज आहेत या सर्व गरजा पूर्णत्वास नेण्यास मी नेहमीच सक्षम राहीन. कारण गावातील सर्वच तरुणांचा या ठिकाणी मला खूप मोठा आधार आहे आणि माझ्याकडून त्यांना अपेक्षा आहेत या अपेक्षा मी नक्कीच पूर्ण करेल याची मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून जर मी या ठिकाणी निवडून आलो तर गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रक्रम देऊन नक्कीच मी गावाच्या पाठीशी असणार आहे आजही आहे पुढेही राहणार शंका नाही अशी ग्वाही देखील प्रा. सुशांत माळी यांनी व्यक्त केली आहे.

सारडे अंतर्गत विकासकामे
आतापर्यंत शेकापक्षाच्या माध्यमातून सारडे ग्रामपंचायतीमध्ये २०१७-२०२२ दरम्यान मोठया प्रमाणावर विकास कामे करण्यात आली आहेत.
यात गावातील अंतर्गत काँक्रीट आणि प्लेवर ब्लॉक,
स्मशानभुमी सारडे नुतनीकरण,
भंगारपाडा स्मशानभुमी नुतनीकरण,
राजिप शाळा सारडे कॉन्फरन्स हॉल,
राजिप शाळा सारडे स्टेज/जिना,
ग्रामपंचायत कार्यालय दुुरुस्ती,
पाणी पाईपलाईन दुुरुस्ती
३० नविन विद्युत पोल उभारणी
२ छोटे साकव
पाण्याची टाकी दुुरुस्ती
संपूर्ण गावात घरोघरी कचराकुंडी वाटप
कोरोना काळात केलेली कामे
सॅनिटायझर बॉटल वाटप
कॅप्सुल वाटप
जंतूनाशक फवारणी
लसीकरण
आरोग्य शिबीर
अन्नधान्य वाटप
आदीवासीवाडीवर केलेली कामे
अन्नधान्य वाटप
घरगुती स्वयंपाक भांडी वाटप
जीवनावश्यक वस्तू वाटप
फर्निचर वस्तू वाटप अंतर्गत खुर्च्या व पंखे वाटप
विजपुरवठा/ विद्युतपोल उभारणे
सोलर पॅनल बसवणे
महिला बचत गटासाठी अगरबत्ती, मेणबत्ती, केक, ज्वेलरी मेकींग प्रशिक्षण
दृष्टीक्षेपातील कामे
व्यायामशाळा नुतनीकरण
तलाव दुुरस्ती
मंदिर जिर्णोध्दार
नवीन पाण्याची टाकी बांधणे
गावांतर्गत नवीन पाण्याची पाईपलाईन टाकणे
एमएमआरडीए अंतर्गत प्रस्तावित ६५ लाखांचे रस्तेबांधणी काम करणे
राजिप शाळा सारडे सरंक्षित भिंत बांधणे, सभागृह बांधणे
वाचनालय उभारणी करणे
सांडपाणी व्यवस्था करणे
रोजगार निर्मितीला प्राधान्य देणे
गरीब गरजु नागरिकांच्या सामान्य समस्या सोडविणे
अन्य समाजोपयोगी कामे करणे
शेकाप शिवसेना आघाडीचे उमेदवार
थेट सरपंच प्रा. सुशांत रामचंद्र माळी
सदस्य सौ कामिनी गणेश पाटील
सौ अस्मिता हिरामण म्हात्रे
किशोर हसुराम ठाकूर
महेश भरत पाटील
नितीन मायाजी म्हात्रे
भगवती अविनाश पाटील
सुविधा अशोक पाटील