| दिघी | वार्ताहर |
विद्येची देवता गणरायाच्या आगमनाचे वेध श्रीवर्धनमधील जनतेला लागले आहेत. शहरातील बाजारपेठ, गणेशमूर्तींचे कारखाने आदी सर्वत्र लगबग दिसून येत आहे. मूर्तिकारांनी बाप्पांच्या मूर्तींवर शेवटचा कटाक्ष टाकून मूर्ती सज्ज केलेल्या आहेत.
माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून बाप्पांच्या मूर्ती घडविल्या आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील बाजारपेठा बाप्पांच्या आगमनासाठी सजलेल्या आहेत. गणेशोत्सवांसाठी भक्तांच्या मागण्यानुसार लागणार्या विविध बाबींची सजावट दुकानात करण्यात आलेली आहे. दुकानदारांनी गणेशोत्सवांच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, झेंडे, दर्जेदार कापड, कलाकुसरीने युक्त असलेले सोन्याचे दागिने तसेच गणेशोत्सव प्रसंगी लागणार्या नानाविध साहित्य बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आलेले आहे . मूर्तिकारांनी बाप्पांवर शेवटचा हात फिरवण्यास सुरुवात केली आहे. सर्वत्र मंगलमय वातावरणात बाप्पाचे आगमन होत आहे .
गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्तींची मागणी वाढलेली आहे. भक्तांना हवी असलेली मूर्ती उपलब्ध करुन दिलेली आहे.
अमोल मुरकर, मूर्तीकार, नवी पेठ श्रीवर्धन
सरकारने उत्सवांवरील सर्व निर्बंध हटवलेले आहेत. त्याबद्दल राज्य सरकारचे आभार. यावर्षी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार आहोत.
शैलेंद्र ठाकूर, रहिवासी, श्रीवर्धन