हापुसची आवक वाढली

दरात घसरण; देवगडच्या 300 पेट्या दाखल
| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
यंदा बाजारात या सर्व फळांचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल उष्ण दमट हवामान यामुळे फळांच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे बाजारात स्ट्रॉबेरी, अंजीर दाखल होण्यास विलंब झाला असून हापूसला ही उशिराने सुरुवात झाली. मागील आठवड्यात एपीएमसीत हापूसची आवक कधी 30 पेट्या तर कधी 100 ते 150 पेट्या दाखल होत होत्या, परंतु या आठवड्यात सोमवारी बाजारात 300 ते 325 पेट्या दाखल झाल्या असून दर ही उतरले आहेत. दिवसांपूर्वी हापूस 4 ते 8 डझन हापूसच्या पेटीला 5 ते 10 हजार तर परिपक्व पिकलेल्या हापुसची 12 ते 15 हजार रुपयांपर्यंत विक्री झाली आहे. तेच सोमवारी 300 हुन अधिक पेट्या दाखल झाल्या असून दरात 2-3 हजारांची घसरण झाली आहे. मार्च मध्ये आवक मोठया प्रमाणात सुरू होईल त्यावेळी दर आणखीन असे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version