योध्दा रेसमध्ये खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी

| अलिबाग | प्रतिनिधी |

ठाणे येथे झालेल्या योध्दा रेस स्पर्धेत 80 खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. स्वप्निल पालकर 1 तास 11 मिनिटे, अभिजीत कारभारी 1 तास 11 मिनिटे, अंकुश ठाकूर 1 तास 24 मिनिट, सागर शिंदे 1 तास 09 मिनिटे, अमित पालकर 1 तास 22 मिनिटे, प्रणव पाटील 1 तास 39 मिनिटे, निकिता पालकर 1 तास 23 मिनिटे, भूमिका पाटील 1 तास 30 मिनिटे, मझिन पटेल 1 तास 30 मिनिटे, मानिषा मेश्राम व धनश्री घोरडडेकर (महिला डबल्स) 1 तास 10 मिनिटे अशी नोंद केली.

या यशामागे मुख्य प्रशिक्षक अद्वैत पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. गेल्या 45 महिन्यांपासून त्यांनी प्रत्येक स्पर्धकासाठी नियोजित प्रशिक्षण, ताकद, सहनशक्ती व मोबिलिटीवर भर देत शिस्तबद्ध तयारी करून घेतली. कामाचा ताण, थकवा व वेदना लक्षात घेऊन प्रशिक्षणात वेळोवेळी बदल करत खेळाडूंना मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्पर्धेसाठी सज्ज केले. या कामगिरीतून स्पष्ट होते की अशा स्पर्धांसाठी ॲथलेटिक्सची पार्श्वभूमी असणे आवश्यक नाही. कठोर मेहनत, सातत्य, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन असल्यास कोणतीही व्यक्ती अशा आव्हानांवर मात करू शकते. ही कामगिरी सर्व सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Exit mobile version