| खरोशी | वार्ताहर |
तालुक्यात देवी देवतांच्या यात्रांना सुरूवात झाली असून, मोठ्या उत्साहाच्या वातावरणात यात्रा संपन्न होत आहेत. चैत्र शुद्ध चतुर्दशी, शुक्रवार, दि. 11 एप्रिल रोजी वाशी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भवानी जगदंबा देवीची महायात्रा होत आहे.
गुरुवारी 10 एप्रिल रोजी रात्री यात्रा दिवस तर शुक्रवारी 11 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता श्रीची महाआरती सकाळी 8 वाजता काट्याचे वजन करून नवस फेडणे, गळाला नवस फेडणे, देवाकाठ्या उभारणे तर दुपारी 12 वाजता पालखी सोहळा व नंतर लेपा मिरवणूक तसेच रात्री 9 वाजता श्रींचा छबिना मंदिरातून निघून गावात फिरवण्यात येणार आहे. असा कार्यक्रम भवानी जगदंबा देवी देवस्थान वाशी यांच्या वतीने महायात्रा महोत्सवात आयोजित करण्यात येत असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.