माथेरान घाटात वटवृक्ष कोसळला

| कर्जत | प्रतिनिधी |
माथेरान घाटात रस्त्यावर शनिवारी (9 जुलै) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मोठा वडाचा सुमारे शंभर वर्षापूर्वीचा वृक्ष पडला सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
शनिवार, रविवार असल्याने माथेरान मध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. घाटात वाहतूक सुरू असतांना वङाचा मोठा वृक्ष मुळापासून उमळून रस्त्यावर पडला. त्यावेळेस कुठलेही वाहन येत-जात नसल्याने सुदैवाने कुठलीही जिवित वा वित्तहानी झाली नाही. किंवा वित्तहानी झाली नाही, वृक्ष समोरील टपरीवजा हॉटेलसमोर पडला परंतु हॉटेलचे कुठल्याही प्रकारचू नुकसान न झाल्याने हॉटेल चालकाने सुटकेचा निश्‍वास सोडला. वृक्ष पडल्याचे समजाच समोरील गावातील आदिवासी बांधव तसेच टॅक्सी चालक मदतीला धाऊन येऊन छोटासा रस्ता बनवून ऐकेरी वाहतूक चालू केली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने वृक्ष बाजूला करून तब्बल दोन तासांनी वाहतूक सुरळीत झाली.

Exit mobile version