रणधूमाळी! निवडणूक यंत्रणा सज्ज; वीस ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील 20 ग्रमापंचायतींमध्ये रविवारी मतदान होत असून,या निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अलिबाग तालुक्यातील वेश्‍वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, कर्जत तालुक्यातील पोटल, पाली तर्फे कथल खलाटी, खालापूर तालुक्यातील चौक, आसरे, लोधीवली, तूपगाव, पनवेल तालुक्यातील खेरणे, पेण तालुक्यातील कोपर, पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी, महाड तालुक्यातील खरवली, माणगाव तालुक्यातील देगाव, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव या ग्रामपंचायतीं मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी (दि.16) होणार असल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. अलिबाग तालुक्यातील वेश्‍वी आणि नवगाव या दोन ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे. या पार्श्‍वभूमीवर अलिबाग तहसीलदार कार्यालयातून कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर मतदान साहित्य नेले.

Exit mobile version