| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोंडा, वझरवाडी, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खुर्द या चार ग्रामपंचायत निवडणुकासाठी सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. एकूण २ हजार ५८८ मतदार असून त्यात पुरुष १ हजार २८३ तर स्त्री १ हजार १३०५ मतदार आहेत.
सकाळी ९.३० ते ११.३० पर्यंत ग्रुप ग्रामपंचायत तुर्भे खोंड मध्ये एकूण २६.६६ टक्के तर ग्रुप ग्रामपंचायत तुर्भे खुर्द मध्ये ५०.०० टक्के मतदान झाले आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत तुर्भे बुद्रुक मध्ये २६.२५ टक्के व ग्रुप ग्रामपंचायत वझरवाडी मध्ये ५५.९८ टक्के इतके मतदान झाले आहे.
.