| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील प्रथम बौद्ध भिक्कू, भंते संघकीर्ती महाथेरो यांच्या मुळ गावी उत्कर्षनगर (झाप) पाली, ता. सुधागड येथे त्यांच्या अनुयायानी श्रामनेर उपासक प्रचार संघाच्या माध्यमातून बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि तथागताचा धम्म गतिमान करण्यासाठी भिक्कू संघास नियमित कार्यरत रहाण्यासाठी तसेच भिक्कू संघास सदस्य मिळावेत या हेतूने भंते संघकिर्ती यांचे हे स्मृतीस्थळ प्रेरणादायी ठरत आहे.
सुधागड तालुक्यात बौद्ध धम्म प्रचार करण्यासाठी सुधागड तालुका बौद्धजन पंचायत ही संस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. त्यांची महती श्रीलंकेतील बौद्ध भंतेजीपर्यंत विश्वशांती बुद्ध विहार- अलिबागच्या माध्यमातून पोहचली. त्यामुळे भन्ते आनंद, महाथेरो, श्रीलंका, भन्ते अनिरुद्ध, थेरो, श्रीलंका, भन्ते आधीचित्तो कर्जत, भन्ते आर्यधम्म, श्रामनेर या भिक्कू संघाने झाप येथील भंते संघकीर्ती महाथेरो यांच्या स्मृती स्थळास ऐतिहासिक भेट दिली.
धम्म अनुयायी म्हणून आपणही धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे व धम्म जगभरात प्रभावीपणे पोहचण्यासाठी तन-मन-धनाने योगदान दिले पाहिजे, असे आवाहन भन्ते आनंद, महाथेरो यांनी यावेळी केले. भन्ते आधीचित्तो कर्जत, राजेंद्र वाघमारे, धम्माशील सावंत यांनीदेखील यावेळी आपले विचार मांडले.
स्मृती स्मारकास श्रीलंकेतील बौद्ध भंतेजींची ऐतिहासिक भेट
