अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

| महाड | वार्ताहर |

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला आहे. सदरची घटना बिरवाडी-काळीज येथे सकाळी उघडकीस आली. रजनी सोनू शर्मा (16, रा. काळीज-खरवली, मूळ, रा. उत्तरप्रदेश) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागे कोणते कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड करत आहेत.

Exit mobile version