ताकईच्या जंगलात सापडला तरुणीचा मृतदेह

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

। खोपोली । प्रतिनिधी ।
धाकटी पंढरी ताकई येथील वनविभागाच्या हद्दीत अनोळखी 25 ते 30 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत खोपोली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा घातपात नसल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धाकटी पंढरी ताकई येथील पायथ्याशी वनविभागाची हाद्द आहे.गुरूवार दि.21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी फेरफटका मारत असतानाच जवळील रूमच्या थोडे बाहेर मयत तरूणीचे पाय दिसले. यावेळी वनविभाच्या कर्मचार्‍याने पोलिसांत माहिती कळवली असता खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आपल्या पथकासमवेत घटनास्थळी पोहोचले. मयत तरूणीची प्राथमिक तपासणी केली असता घातपात नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. या तरुणीचे वर्णन पुढीलप्रमाणे, वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, अंगात नेसुस-सफेद लाइनिंगचा टॉप, हिरव्या कलरची लेगीज, कानात गोल रिंग, उजव्या हातात काळ्या ठिपक्याची लाल बांगडी, डाव्या हातात हिरव्या बांगड्या व घड्याळ घातले आहे.
तरी वरील वर्णनाची मयत तरुणी कोणाच्या ओळखीची, मिसिंग दाखल असेल तर खोपोली पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. 02192263333 तसेच पोलीस निरीक्षक शिरीष पवार मो.नं.9870155601 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version