कोलाड-भिरा रस्त्यालगत आढळला मृतदेह

| कोलाड | प्रतिनिधी |
कोलाड भिरा रस्त्यालगत रविवारी 12 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास अंदाजे 55 वयाचा अनोळखी बेवारस पुरुष इसमाचा मृतदेह आढळला आहे.या अज्ञाताचे कोणी नातेवाईक असल्यास पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आव्हान आवाहन कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी केले आहे.

जोशी फार्महाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यागताच्या झाडाखाली अज्ञात मृतदेह आढळला .हा घात आहे की, अपघात अशी चर्चा आंबेवाडी नाक्यावर होती. या घटनेची नोंद कोलाड पोलिसात आकस्मिक मृत्यु अशी करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी नितिनकुमार पोदकुळे यांनी भेट दिली असून या घटनेचा तपास कोलाड सपोनि अजित साबळे,श्रीराम मोरे करीत आहेत.

Exit mobile version