तळोजा जेलसमोरील तलावात मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा जेल समोरील तलावात शुक्रवारी सकाळी एक इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 30 ते 35 वयोगटातील धडधाकट मजबूत तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना दिसले. त्यांनी तात्काळ खारघर पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्वरित खारघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला. सदर इसमाचे नाव मयांकसिंग असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, हा इसम याठिकाणी का आला होता? त्याचा घातपात केला की त्याने आत्महत्या केली, याचा शोध खारघर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version