उड्डाणपुलाखाली आढळला मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |
शहरातील गांधी हॉस्पिटलजवळील उड्डाणपुलाखाली एका इसमचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. या इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्षे, रंग सावळा, फ्रेंच कट दाढी, केस बारीक असून, अंगात फूल बाह्याचा सफेद रंगाचा टी शर्ट आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version