पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या- उच्च न्यायालय

| पुणे | प्रतिनिधी |
पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लवकर घ्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणूक अद्याप झाली नाही. त्याबाबत बुधवारी न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापले.

पुणे लोकसभा मतदार संघातील भाजपचे खासदार गिरीश बापट आणि चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघाच्या जागा रिक्त होत्या. त्यानंतर काही महिन्यात दोन्ही मतदार संघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. पण जवळपास दहा महिन्यानंतरही निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल झाली नाही.

त्यामुळे या दोन्ही जागा येत्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आज मुंबई उच्च न्यायालयाने पुण्याची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी, तर बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले होते. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे.

Exit mobile version