| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या 17 रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात महिनाभर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्याने आता विधान परिषदेच्या प्रलंबित निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील 78 सदस्यीय विधान परिषदेत 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडून येतात. त्यापैकी 17 जागा सध्या रिक्त आहेत. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात यंदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या जागेवर राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे सलग दोनदा विजयी झाले होते. मात्र, कोकणात भाजपाचे वाढते वर्चस्व लक्षात घेता ही जागा भाजप कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची चर्चा सुरू आहे. ठाणे-पालघर मतदारसंघातही शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रतिष्ठेची लढत रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वि.प. निवडणुकीचे वाजणार बिगुल
