बस स्थानक झाले पार्किंग ठिकाण

| खोपोली । प्रतिनिधी |
शिळफाटा यावर एसटी महामंडळाचे एकमेव बस स्थानक असून या ठिकाणी मुंबई,पुणे या दोन मोठ्या शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात जाणार्‍या एसटी बसची सेवा सुरू आहे. खालापूर तालुक्यातील तसेच तालुक्याला जोडून असलेल्या अन्य तालुक्यात जाणार्‍या एसटी बसच्या फेर्‍या या ठिकाणावरून नियमितपणे सुरू असल्याने या बस स्थानकात एसटी प्रवाशांची रेलचेल सुरू असते,मात्र काही एसटी बस स्थानकाचा ताबा हा प्रायव्हेट गाड्या पार्किंगसाठी केला जात असल्याचे पाहायला मिळत असून या प्रायव्हेट गाड्यांपासून प्रवासी तसेच एसटी बस चालकाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे भविष्यात छोटा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या कर्जत आगारातील अधिकार्‍यांनी गांभिर्य ओळखून तात्काळ प्रायव्हेट पार्किंग बंद करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version