। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यपदांची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. ही निवडणुक 21 डिसेंबर रोजी संपन्न झाली. जिल्ह्यातील 179 ग्रामपंचायतींच्या 286 सदस्यांसाठी पोटनिवडणूक झाली.

या निवडणूकित अलिबाग तालुक्यातील बामणगाव व ताडवागळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकित शेकापने बाजी मारली. दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. यामध्ये बामणगाव येथील लंकेश नागावकर यांचा 150 मतांनी तर ताडवागळे ग्रामपंचायत पोटनिवडणूकित नावजी शिंद यांचा 30 मतांनी विजय झाला.






