| पनवेल | प्रतिनीधी |
भरधाव वेगाने असलेल्या कारची एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भारत पेट्रोलियमच्या टँकरला पाठीमागून धडक दिल्याची घटना कळंबोली येथे घडली आहे. या घटनेत कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत. कल्याण येथील कुणाल भालेराव यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरकार ही भरधाव वेगाने चालवत पुणे ते मुंबई लेन वरती कळंबोली सर्कलच्या जवळ दीड ते तीन किलोमीटरच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या भारत पेट्रोलियमचे टँकरला पाठीमागून धडक दिली. याधडकेत कारमधील कुणाल भालेराव आणि मंथन ठक्कर हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कारचालक कुणाल भालेराव यांच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.