। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील डॉ. कोल्हे दवाखान्यासमोर हेरंब बिल्डिंगखाली पार्क केलेल्या चार चाकी वाहनाला अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच महाड नगरपरिषद अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तत्परतेने पाणी मारून आगीवर काही वेळातच नियंत्रण मिळवले. सदर वाहन हे महेश इब्राहिम पुरकर यांचे असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन विभागातील कर्मचारी गोविंद साळुंखे (अधिकारी), वाहन चालक शेखर भोसले, फायरमन संकेत खोपकर, प्रतीक शितोळे, केदार देसाई, आदित्य खोत तसेच अग्निशमन विभागाचे ठेकेदार शशिकांत कदम आणि सेवा निवृत्त अधिकारी गणेश पाटील उपस्थित होते.
कारला लागली अचानक आग
