चौल दत्त मंदिर चोरी अद्याप धागेदोरे नाहीत

चौल दत्त मंदिर चोरी अद्याप धागेदोरे नाहीत
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
चौल भोवाळे येथील दत्त मंदिरातील चोरी प्रकरणाचा तपास करण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. चोरीप्रकरणी आवश्यक ते धागेदोरेही न मिळाल्याने भक्तवर्गात अस्वस्थता पसरली आहे.पोलिसांनी शीघ्रगतीने तपास करावा,अशी मागणी जोर धरत आहे.

श्री दत्त मंदिरात गाभार्‍यातील 24 लाख किमंतीचा 40 किलो वजनाची चांदीचा भिंतीवरील नक्षीकामाचा पत्रा अज्ञात चोरटयांनी चोरला आहे.चोरी करताना चोर सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहेत.मात्र त्यांचा मागमूस काढण्यात यंत्रणेला अपेक्षित यश मिळताना दिसत आहे. रेवदंडा पोलिसानी यासाठी विशेष पथकही नियुक्त केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा केला व तेथील सीटीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. या घटनास्थळी अलिबाग विभागीय पोलिस अधिकारी यांनी समक्ष भेट दिली, तर तपास पोलिस निरीक्षक देविदास मुपडे हे करत आहेत.

Exit mobile version