मुख्यमंत्र्यांनी घेतली पाटील कुटुंबियांची भेट

मिनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल सांत्वन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

राज्याच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्या निमित्ताने पेझारी येथे त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील  कुटूंबियांची शुक्रवारी (दि.5 ) दुपारी भेट घेतली. यावेळी आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, मिनाक्षी पाटील यांचे सुपूत्र तथा शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांचे सांत्वन केले.

1 / 6

तसेच, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, मिनाक्षी पाटील यांच्या स्नुषा चित्रा पाटील, नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सवाई पाटील, सुमन पाटील, राजन पाटील, नीता पाटील आदी पाटील कुटुंबियांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले.

Exit mobile version