माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नांना यश
| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली गावातील स्थानिक प्रकल्पग्रसतांच्या घरांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विभागाला स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागल्याने सिडकोच्या पथकाला कारवाई न करताच हात हलवत माघारी फिरावं लागलं आहे. मंगळवारी (दि.28) करण्यात आलेल्या या विरोधावेळी स्थानिक गावाकर्यांसोबत माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना उबाठा गटाचे नेते बबन पाटील, सुदाम पाटील, माजी नगरसेवक गोपाळ भगत, सरस्वती काथारा, ज्योती मोहिते, सूर्यकांत म्हसकर, अरविंद कडव, अनंता भगत, दिपक पाटील व ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते.
स्थानिकांकडून करण्यात आलेल्या तीव्र विरोधानंतर सिडकोस कारवाई थांबवणे भाग पाडले. सदर कारवाई थांबवण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी अथक प्रयत्न केल्याबद्दल ग्रामस्थांकडून माजी आमदार पाटील यांचे आभार मानले. तसेच, कारवाई थांबवण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानण्यात आले. कळंबोली येथील प्रकल्प ग्रस्ताची 35/40 वर्षापूर्वीची घरे अनधिकृत ठरवून त्या घरांवर अचानक कारवाई करण्यासाठी सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी पोलीस फौज फाट्यासह आले होते.