एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळ एक मालगाडी रुळावरून खाली घसरल्याची घटना आज घडली आहे ही. घटना कळंबोली ते पनवेल या स्टेशनच्या दरम्यान घडली असून ही ट्रेन पनवेलहून वसईकडे निघाली होती. यावेळी हा अपघात झाला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोण्हीती जीवित हानी झाली नसली तरी मालगाडीचे 5 ते 6 बोग्या रुळावरून खाली उतरल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
पनवेल जवळ झालेल्या या मालगाडीच्या अपघातामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी एक्सप्रेसची वाहतूक मात्र ठप्प आहे. या रेल्वे अपघाताचा उपनगरीय सेवेला कोणताही फटका बसलेला नसून ही सेवा सुरळीत पणे सुरु आहे. या मालगाडीमध्ये लोखंडी कॉईल असल्याने ते बाजूला काढून डब्बे पुन्हा रुळावर आणण्याचे मोठे आवाहन रेल्वे प्रशासनासमोर आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले