पावसाळ्यानंतर अस्वच्छतेत वाढ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नांकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांचे दुर्लक्ष होत असल्याने दाखल होणार्या रुग्णांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाही. परिसरात पावसाळ्यांनंतर अस्वच्छतेमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या नर्सिंग टे्रनिंग सेंटरमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना तसेच नव्याने दाखल केल्या जाणार्या रुग्णांना हलवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या प्रकाराकडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ माने यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
रुग्णांच्या आरोग्याऐवजी इतर प्रश्नांकडेच लक्ष देणार्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्या कारनाम्यांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात गैरप्रकार वाढू लागले आहेत. रुग्णांच्या उपचाराकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण पसरु लागले आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या बेजबाबदारपणाचा फटका मात्र प्रामाणिकपणे उपचार करणार्या डॉक्टरांना बसत असल्याने डॉक्टरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरत आहे. जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणावर असुविधा आहेत. या असुविधांकडे वेळीच लक्ष देऊन सुधारणा करण्याऐवजी डॉ सुहास माने फक्त कागदी घोडे नाचविण्याचे आणि व्हीडीओ कॉन्फरन्समध्येच मग्न आहेत.
नव्याने सुरु झालेल्या नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमधील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण दाखल करताना स्टे्रचरवरुन नेताना खाचखळग्यातून न्यावे लागत आहे. त्यामुळे अत्यवस्थ असणार्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र या समस्येकडे लक्ष देऊन त्याच्या सोडवणूक करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक काहीच करत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
कोविड सेंटरमध्ये रात्री 9 नंतर नातेवाईकांना नो एंट्री
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. विक्रमजीत पडोळे यांना रुग्णाच्या नातेवाईकाच्या मित्राने कोविड सेंटरमध्ये धक्काबुक्की करून डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना 8 जून रोजी घडली होती. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना रात्री 9 वाजल्यानंतर येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, नातेवाईक त्यांच्या रुग्णाला व्हाट्सअॅप कॉलद्वारे संपर्क करू शकतात. जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक निर्बंध लावले आहेत. कोविड सेंटरमध्ये रात्री 9 वाजता दरवाजे बंद केले जाणार आहेत. नातेवाईकांना आत प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, नातेवाईकांना त्यांच्या रुग्णाला व्हाट्सअॅप कॉलद्वारे संपर्क करण्यास परवानगी असणार आहे. नातेवाईकांना काही अडचण असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. कोरोनाच्या या काळात आपण आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावेफ, असे आवाहन जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले आहे. दरम्यान, कोविड सेंटरबाहेर पोलीस आणि रुग्णालय सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले