स्थापना दिन सोहळ्यात काँग्रेसचा ध्वज कोसळला

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली खरी. मात्र, तो झेंडा त्यांच्याच हातावर येऊन पडला. तेव्हा सारेच सैरभर झाले.
सोनिया गांधी यांनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली. पक्षाचा झेंडा वर गेला. मात्र, काही क्षणातच तो झेंडा त्यांच्या हातावर येऊन पडला. यामुळे क्षणभर सोनिया गांधी सुद्धा अवाक झाल्या. त्या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी आणि कार्यकर्ते सैरभर झाले. मात्र, सोनियांनी संयमाने परिस्थिती हाताळली. पुन्हा एकदा रितसर झेंडा फडकावण्यात आला.

Exit mobile version