| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या डोंगरातील पाणी वाहून येणारे नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरण सोमवारी ( 4 जुलै) सायंकाळी तुडुंब भरून वाहू लागले आहे. गेली काही दिवस पावसाचा लपंडाव सुरु असताना आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने बळीराजा खुश झाला असून शेतीच्या कामांची लगबग वाढणार आहे, मात्र नेरळ गावाच्या मध्यभागातून वाहणार्या ब्रिटिशकालीन धरण ओव्हरफ्लो असंख्य नेरळकर धरणाच्या बाजूला गणेशघाटावर पाणी पाहण्यासाठी पोहचले आहेत.
नेरळ गावाच्या मध्यभागी गणेश घाटाच्या बाजूला ब्रिटिश क्लीन धरण असून त्या धरणात येणारे पाणी हे माथेरान च्या डोंगरातील पाणी असते. त्यामुळे माथेरानच्या डोंगरात सतत दोन तीन दिवस संततधार पाऊस सुरु असल्यास नेरळ येथील धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागते. त्यामुळे जुलै महिना सुरु झाला तारू नेरळ येथील ब्रिटोईश कालीन धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले नव्हते. मात्र आज 4 जुलै रोजी सकाळपासून माथेरान च्या डोंगर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यात नेरळ भागात देखील पावसाची संततधार सुरु असल्याने जोरदार पावसामुळे ब्रिटिशकालीन धरण भरून वाहू लागले आहे. धरणाच्या भिंतीवरून वाहणारे पाणी न्याहाळण्यासाठी नेरळकर यांच्याकडून गर्दी करण्यात आली आहे. त्यात धरणाच्या भिंतीवरून वपणी वाहू लागल्याने मासे पकडण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.