| पुणे | वार्ताहर |
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आला आहे. या बातमीने खळबळ उडाली आहे.
दत्तात्रय कुरळे असे या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव असून ते पुणे पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. दरम्यान काल नागपुरात पोलीस स्टेशनमध्येच एका पोलिसावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला होता, ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांचा मृत्यू नेमका काशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पुण्यात आढळला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह
