| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे येथील मोदी पार्क इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणारा अविवाहित तरुण रविराज माणिक साळुंखे (27) मूळ रा. मानसी प्राइड, फ्लॅट नं.एस 2, तिसरा मजला, घुमाळ आळी, सह्याद्री अभ्यासिकेजवळ ता.जि. सातारा या तरुणाने अंबा नदीवरील वाकण येथील जुन्या पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या तरुणाचा मृतदेह बाळसई गावाच्या हद्दीतील अंबा नदीच्या पात्रात शनिवारी (दि.22) सकाळी आढळून आला आहे. या तरुणाने नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याचे कारण प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करीत आहेत.






