चुनाभट्टी पूल परिसरात आढळला मृतदेह

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल-पेण महामार्गावरील चुनाभट्टी पुलाशेजारील परिसरात एका इसमाचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध दादर सागरी पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय ४० ते ५० वर्ष, अंगाने मध्यम, केस काळे, चेहरा उभट असून अंगात ग्रे रंगाचे हाफ बाह्याचे टीशर्ट व पिवळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट तसेच हातात स्टील आणि तांब्याचे दोन कडे घातलेले आहेत. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास दादर सागरी पोलीस ठाणे, फोन 9405830709 किवा सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.डी.पाटील, पोलीस उपनिरीक्षक एस. एन. रासकर यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version